Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनराणी मुखर्जीच्या 'मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे' चा ट्रेलर रिलीज

राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ चा ट्रेलर रिलीज

मुंबई | Mumbai

आपल्या विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Bollywood actress Rani Mukerji) ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून येत्या मार्चमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच रिलीज झाला आहे. कुटुंब, नागरिकत्व, न्यायालयीन लढाई, मातृवाचे भावविश्व अशा अनेकविध विषयांनी मनोरंजनाबरोबरच (Entertainment) तांत्रिक प्रश्नांना भिडणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ. कुसुमताई गायकवाड यांचे निधन

मोठ्या काळानंतर राणी मुखर्जीचा दमदार अभिनय यात बघायला मिळतो आहे. हा चित्रपट २०११ मधील नॉर्वेतील एका प्रकरणावर आधारित आहे. त्यात भारतीय दाम्पत्याला त्यांच्या मुलांपासून वेगळे केले जाते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; पुढील युक्तिवाद ‘या’ तारखेला

ट्रेलरची सुरुवात ही मिसेस चॅटर्जी (Mrs Chatterjee Vs Norway) या दोन मुलं आणि पतीसह नॉर्वेमध्ये राहतात. अचानक एके दिवशी दोन स्त्रिया त्यांची मुले त्यांच्याकडून हिसकावून घेतात आणि त्यांना एका पाळणाघरात ठेवतात. तिथल्या सरकारला वाटतं की श्रीमती चटर्जी आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत.

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून

ती आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी नॉर्वे (Norway) आणि भारतातील कोर्टात जाते. तिला तिची मुलं कोणत्याही परिस्थितीत परत हवी असतात. मी एक चांगली आई आहे, असा डायलॉग राणी ट्रेलरमध्ये बोलताना दिसत आहे. हा चित्रपट १७ मार्च पासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या