राखी सावंत बॉयफ्रेंडसोबत रडत रडत पोहोचली पोलीस ठाण्यात; काय आहे प्रकरण?

राखी सावंत बॉयफ्रेंडसोबत रडत रडत पोहोचली पोलीस ठाण्यात; काय आहे प्रकरण?

मुंबई । Mumbai

ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचे चिन्ह नाही. राखी सावंत कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस राखी सावंत वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे...

राखी सावंत सध्या दुबईस्थित (Dubai) उद्योगपती आदिल दुर्रानीला (Adil Durrani) डेट करत आहे. पण यावेळी ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. शनिवारी रात्री बॉयफ्रेन्ड आदिल दुर्रानीसोबत राखी सावंत ओशिवारा पोलिस ठाण्यात (Oshiwara Police Station) पोहोचली.

यावेळी तिला पापाराझींनी पोलिस ठाण्यात येण्याचे कारण विचारले असता ती कॅमेऱ्यांसमोरच ढसाढसा रडताना दिसली. आपला पूर्वाश्रमीचा पती रितेश आपला छळ (Persecution) करत असून आपल्यावर संशय घेत असल्याचा आरोप राखीने केला आहे.

राखी सावंत पुढे म्हणाली की, रितेशने माझे सोशल मीडिया (Social media) अकाउंट हॅक केले. तसेच रितेश माझे आयुष्य (Life) उद्ध्वस्त करत असून मला आणि आदिलला एकत्र राहू देणार नसल्याची धमकी त्याने मला दिली. तसेच 'तीन वर्षांत त्याने माझ्यासोबत खूप गैरवर्तन केले.

याशिवाय त्याने माझे सर्व फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले असून तो मला ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे मी त्याची तक्रार करायला पोलिसात आले आहे. माझा मुंबई पोलिसांवर (mumbai police) पूर्ण विश्वास असून ते मला साथ देतील असे देखील राखीने सावंतने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com