अभिनेते रजनीकांत यांचा महत्वपूर्ण निर्णय; राजकारणाला कायमचा रामराम

पक्षही विसर्जित
अभिनेते रजनीकांत यांचा महत्वपूर्ण निर्णय; राजकारणाला कायमचा रामराम

दिल्ली | Delhi

अभिनेते रजनीकांत (Actor Rajinikanth) यांनी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. रजनीकांत यांनी राजकारणालाच पूर्णविराम दिला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ (Rajini Makkal Mandram) हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

अभिनेते रजनीकांत यांचा महत्वपूर्ण निर्णय; राजकारणाला कायमचा रामराम
Bimal Roy Birth Anniversary: मनोरंजनातुन समाजप्रबोधन करणारे 'बिमल रॉय'

याविषयी माहिती देताना अभिनेते रजनीकांत म्हणाले की, 'रजनी मक्कल मंद्रम पक्ष (RMM) विसर्जिक करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही. रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे 'रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम' किंवा 'रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम'मध्ये (Rajinikanth Fan Club Association) रुपांतर करण्यात येईल.'

तसेच, 'राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत त्यात चर्चा केली जाईल. 'मी राजकारणात प्रवेश करावा की नाही यावर आम्ही चर्चा करू. कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो', असे रंजनीकांत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

अभिनेते रजनीकांत यांचा महत्वपूर्ण निर्णय; राजकारणाला कायमचा रामराम
Dilip Kumar : दिलीप कुमार यांना 'ट्रॅजेडी किंग' का म्हणतात?

दरम्यान २९ डिसेंबर २०२० रोजी रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याबाबत विचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारणात हालचाल सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका न लढण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे रजनीकांत राजकारण सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता त्यांनी त्यांच्या राजकारणात येण्याबाबतच्या संभ्रमावर पडदा टाकला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com