अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

jalgaon-digital
1 Min Read

हैदराबाद l Hyderabad

जेष्ठ अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती खालावली असल्याने हैदराबादमधील अपोलो रूग्णालयात त्यांना दाखल केलं आहे.

नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होते. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील ८ जणांना करोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. अन्नाथे या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. २२ डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील करोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं.

रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, रजनीकांत यांच्यामध्ये कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षण आढळून आली नाहीत, पण रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे आणि त्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात भरती करण्यात आलं आहे. रजनीकांत यांना डिस्चार्ज देण्यापूर्वीच त्यांचा रक्तदाब कमी होईपर्यंत तपासणी केली जाणार आहे तसंच रुग्णालयात बारीक देखरेखही ठेवण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *