सलमान खानच्या 'राधे' सिनेमाचं टायटल ट्रॅक रिलीज

सलमान खानच्या 'राधे' सिनेमाचं टायटल ट्रॅक रिलीज

मुंबई | Mumbai

बहुचर्चित असलेल्या राधे या सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे. अभिनेता सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंट वरून ही पोस्ट शेअर केली आहे.

कोरोना व्हायरस संकटाचा परिणाम फिल्म इंडस्ट्रीवर देखील झाला. सिनेमागृह बंद असल्याने अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. तर अनेक सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. यापैकी एक सिनेमा म्हणजे सलमान खान चा बहुचर्चित सिनेमा 'राधे'. हा सिनेमा मागील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार होता.

परंतु, कोविड-19 लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. मात्र ईद 2021 च्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलजी होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ट्रेलर रिलीज करण्यग आला होता. आज या सिनेमाचे टायटल टट्रॅक रिलीज करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com