वाघाच्या जवळ जाऊन व्हिडीओ काढणं रवीना टंडनला पडलं महागात... नेमकं काय घडलं?

वाघाच्या जवळ जाऊन व्हिडीओ काढणं रवीना टंडनला पडलं महागात... नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Ravina Tondon) ही एक उत्तम वाईल्डलाईफ फोटोग्राफरदेखील (Wildlife photographer) आहे. वर्षातील बराचसा काळ ती जंगल सफारी करण्यात घालवते.

नुकतीच ती मध्यप्रदेशातील सातपुडा टायगर रिझर्व्हमध्ये गेली होती. तिथे तिने वाघाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. मात्र हे करत असताना जंगलाचा नियम तिने मोडला. वाघापासून कमीत कमी किती अंतर दूूर उभं राहायला हवं, याबाबत वनविभागाचे काही नियम आहेत. या नियमांचा रवीनाने भंग केल्याच आरोप केला जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रवीना टंडनने वाघ आणि त्याच्या बछड्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या व्हिडिओमूळेच तिच्या अडचणी वाढल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, वन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) धीरज सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनंतर या व्हिडीओची आणि चालक आणि तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com