घराणेशाहीवर प्रियंकाचेही बोट
मनोरंजन

घराणेशाहीवर प्रियंकाचेही बोट

चित्रपट गमावल्यानंतर निराश झाल होते. चित्रपटाच्या निर्मात्याने माझ्याऐवजी दुसरीची शिफारस केली.

Anant Patil

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवुडमध्ये घराणेशाहीवर चर्चा गरम आहे. दररोज एक नवा स्टार किंवा गायक यावर समोर येत आहे. या यादीत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राचे नावही सामील झाले आहे. एका मुलाखतीत तीने घराणेशाहीमुळे हातातून काढून घेतलेल्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे.

सध्या घराणेशाहीच्या मुद्याने चित्रपट उद्योगाला ढवळून काढले आहे. प्रियंका म्हणते, घराणेशाहीमुळे चित्रपट गमावल्यानंतर निराश झाल होते. चित्रपटाच्या निर्मात्याने माझ्याऐवजी दुसरीची शिफारस केली. मात्र यशाला गवसणी घालणारे सर्व अडथळ्यांवर मात करतात.

मात्र याच वेळी तीने स्टारकिड्सबाबत सहानुभूतीही दाखविली आहे. ‘मोठ्या घरात जन्मात येण, हा काही गुन्हा नाही. त्यामुळे स्टार किड्सला दबावालाही समोरं जाव लागतं.’ असे ती म्हणते. सध्या प्रियंका बॉलिवुडसोबत हॉलिवूडमध्येही व्यस्त आहे.

Deshdoot
www.deshdoot.com