परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट! अंगावर शहारे आणणारा 'सरसेनापती हंबीरराव'चा ट्रेलर पहिला का?

परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट! अंगावर शहारे आणणारा 'सरसेनापती हंबीरराव'चा ट्रेलर पहिला का?

मुंबई | Mumbai

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशा 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..', असे म्हणत....

गेल्या वर्षी 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या जबरदस्त टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे.

सह्याद्राचा कडा श्वास रोखून खडा अशा प्रवीण तरेडेंच्या (Pravin Tarade) दमदार डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलरमध्ये सरसेनापती हंबीरराव म्हणून प्रवीण तरेडेंची दमदार अंदाजात एंट्री झाली आहे. परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट अशा अनेक जबरदस्त डायलॉगने सरसेनापतीचा ट्रेलर भरलेला आहे.

हा चित्रपट येत्या २७ मे २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Related Stories

No stories found.