नाशिकच्या कलाकारांच्या साथीने प्रशांतची कोटींची उड्डाणे....

नाशिकच्या कलाकारांच्या साथीने प्रशांतची कोटींची उड्डाणे....
Prashant nakti (प्रशांत नाकती)

नाशिक | दि. १८ प्रतिनिधी

दादासाहेब फाळकेंच्या नाशिक कलानगरीत रायगडाचा प्रशांत नाकती लवकरच स्थानिक कलाकार , तंत्रज्ञानासोबत घेवून एक नवं कोर गाणे चित्रित करणार आहे.

माझी बायगो साँग
माझी बायगो साँगMajhi Baay Go song was on #trending no 1 on Youtube Majhi Baay go is first marathi song having 100K+ Reels on instagaram..
मी नादखुळा
मी नादखुळा2.1 crore views
इसक झाल रं...
इसक झाल रं...

याआधी त्यानें निर्मिती केलेल्या २० हुन अधिक गाण्यांना करोडोंचे व्हिवुझ मिळाले असून, त्याने काढलेला प्रत्येक अल्बम तुफान लोकप्रिय होत आहे. माझी बायगो या गाण्याला अवघ्या चार महिन्यात जवळजवळ सहा कोटींचे views मिळाले आहेत. इतरही अनेक गाणी तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतली आहे.

याशिवाय त्याच्या या विशेष कामगिरी साठी त्याला युथ आयकॉनिक अवॉर्ड २०२० नेही सन्मानीत करण्यात आले होते.

आता रसिक प्रेक्षकांसाठी प्रशांत काय घेऊन येणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. या निमित्ताने एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या प्रशांतचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com