प्राजक्ता गायकवाडचे नवं गाणं पाहिलं का?

"स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज" (Swarajya Rakshak chhatrapati sambhaji maharaj) या मालिकेत महाराणी येसूबाई (Maharani Yesubai)राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात तिच्या अभिनयाच्या जोरावर घर केले आहे....

ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि अजूनही प्रेक्षक या भूमिकेसाठी तिला दाद देताना दिसतात.आता प्राजक्ता प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ता ऍक्टिव्ह असते आणि प्रेक्षकही तिला मनापासून प्रतिसाद देतात. त्याच प्रेक्षकांसाठी प्राजक्ता 'साजनी' या गाण्यातून भेटीस येत आहे.

"साजनी" (Sajani) या गाण्याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली हे गाणं अतिशय सुंदर आहे. ऐकायला खरंच खूप छान आहे याचे म्युझिक बिट्स गाणे ऐकणाऱ्याला गुणगुणायला लावतात. आणि हे गाणं जर सकाळी ऐकलं तर खूप फ्रेश वाटेल कारण या गाण्याचे म्युझिक खूप प्लेजेंट आहे.

या आधी ऐतिहासिक भूमिकेत पहायला मिळणारी प्राजक्ता आता या गाण्यात नॉर्मल लुक मध्ये दिसतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच ६ ऑक्टोबरला या गाण्याचा टिझर लाँच (Teaser Launch) झाला असून आता हे गाणं प्रेक्षकांना युट्युब, मायबोली चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या गाण्याची निर्मिती निर्माते शिवाजी जवळे, संदीप कुंजीर, गजानन सानप, संदेश भोंडवे यांनी केली आहे. तर S4G प्रॉडक्शन प्रस्तुत हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार असून त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. "साजनी" हे त्यांच्या स्वप्नातील गाणं आहे. हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या मनामनातलं, स्वप्नातलं गाणं असल्याने प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच भावेल यांत शंकाच नाही.

हे गाणे धैर्य आणि तेजस यांनी स्वरबद्ध केले असून याची संकल्पना निर्माते शिवाजी जवळे यांची आहे. या गाण्याला धीरज भालेराव (Dhiraj Bhalerao) यांनी दिग्दर्शित केले असून याचे डिझायनिंग शलाका बोजवार यांनी केले आहे. तर सीमा दारवटकर (Seema Darvatkar) यांनी मेकअप आर्टिस्टची भूमिका उत्तमरीत्या पेलवली. बाळा कांबळे (Bala Kambale) यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com