अजय देवगनच्या ‘मैदान’ चं पोस्टर रिलीज

ऑक्टोबर मध्ये चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अजय देवगनच्या ‘मैदान’ चं पोस्टर रिलीज

मुंबई - Mumbai

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने त्याच्या आगामी चित्रपट ‘मैदान’ चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. हा चित्रपट 15 ऑॅक्टोबर 2021 मध्ये रिलीज होणार आहे. ‘मैदान’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण काळावर प्रकाश टाकला जाणार आहे.

अजय देवगनचा हा चित्रपट या पूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज होणार होता असं सांगण्यात आलं होतं. कोरोनाच्या संक्रमणामुळे चित्रपटाचं शुटिंग थांबवण्यात आलं होतं. त्याचा परिणाम चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेवर झाली. त्यामुळे आता या चित्रपटाच्या रिलीजची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अजय देवगनने त्याच्या ‘मैदान’ या चित्रपटाचं पोस्टर टिवटरच्या माध्यमातून रिलीज केलंय. त्यानं लिहलंय की, ‘मैदान आता 2021 साली दसर्‍याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं शुटिंग जानेवारी 2021 मध्ये सुरु होईल. ‘अनेक भाषेत रिलीज होणार

हा चित्रपट हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि मल्याळम या प्रादेशिक भाषेत रिलीज होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com