मुंबई - Mumbai

सैराट चित्रपटकापासून लोकप्रिय झालेली रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ऑनलाई पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. अशाच एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

रिंकू उर्फ आर्चीनं पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

‘लोभ नियंत्रणात ठेवणं हिच खरी संपत्ती आहे.’ अशा आशयाची कॉमेंट करत रिंकूनं आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमधील तिचं सौंदर्य पाहून चाहते सैराट झाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी रिंकूच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.