ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणासाठी परवानगी

ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणासाठी परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई | Mumbai -

जेष्ठ कलाकारांना टिव्ही मालिका आणि इतर शूटसाठी सेटवर येण्यावर घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. Mumbai High Court अनलॉक 3 साठी जेव्हा नवी नियमावली जाहीर होईल तेव्हा कदाचित हे चित्र बदलेल अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली होती, मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर करत राज्य सरकारचा आदेश अखेर रद्द केला. Permission for elderly actors to shoot

जेष्ठ नागरीकांसाठीचे नियम हे सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या हितासाठीच तयार केलेले आहेत. करोनाच्या काळात जर ही मंडळी थोडे दिवस सक्तीनं घरी बसले तर ते त्यांच्या आरोग्यसाठी लाभदायक आहे, असं स्पष्टीकरण राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आलं होतं.

मात्र राज्य सरकारचे हे नियम जाचक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला. हायकोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांच्याबाजूनं आपला निकाल जाहीर केला.

Related Stories

No stories found.