देशभक्तीची भावना जागृत करणारे 'संदेसा' गीत प्रेक्षकांच्या भेटीला

देशभक्तीची भावना जागृत करणारे 'संदेसा' गीत प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

यंदा देशभरात, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आपल्या देशाबद्दल सदभावना व्यक्त करताना, आपल्या मातृभूमीच्या सुरक्षेसाठी बॉर्डरवर सतत आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या वीर-जवानांच्या आठवणीत निर्माता आशुतोष उपाध्याय यांनी आपल्या ओरिजनल म्युजिक गॅंग निर्मितीसंस्थेअंतर्गत 'संदेसा' (Sandesa) या देशभक्तीपर गाण्याची निर्मिती केली आहे...

सावन कुमार सावन द्वारा लिखित आणि संगीतबद्ध या गाण्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राजा हसन यांनी गायले आहे आणि या गाण्याचे दिग्दर्शन विनय सांडिल्य यांनी केले आहे.

निर्माता आशुतोष उपाध्याय म्हणाले की, वीर- जवान बॉर्डरवर दिवस-रात्र आपला प्राण पणाला लावून जागे असल्यामुळेच आपण सुखात जगू शकतो आहे, आणि मनापासून त्यांचे आभार मानण्यासाठीच 'संदेसा' या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

दिग्दर्शक विनय सांडिल्य म्हणाले की, संदेसा नावाप्रमाणेच या गाण्याची गोष्ट आहे. लाखो किलोमीटर लांब आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या वीर-जवानांसाठी "संदेसा" किती भावनिक असतात, आणि तशाच आठवणीत त्यांच्या घरचे देखील असतात, या गाण्यात हेच सगळे दाखवण्यात आले आहे. हे गाणे पाहून देशभक्तीला स्फुरण येईल.

या गाण्यात राजवीर सिंग, शिव सिंग, लोकित फुलवानी आणि अब्राहम खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गाण्याचे कार्यकारी निर्माता भुपेंद्रकुमार नंदन आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com