Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनपठाण चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

पठाण चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई । Mumbai

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहाम (John Abraham) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांची मुख्य भूमिका आहे.

- Advertisement -

या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शाहरुखने नुकत्याच आपल्या इंस्ट्राग्राम अकाउंटवर (Instagram account) आपल्या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान आणि जॉन अब्राहाम चित्रपटातून प्रथमच एकत्र काम करणार आहेत. सिद्धार्थ आंनद (Siddharth Anand) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान, २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. यशराज फिल्म्सला (Yashraj Films) ५० वर्ष पूर्ण झाल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत असून हा चित्रपट हिंदी ,तामिळ, तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या