Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनपठाण चित्रपटाने गाठली कमाई ची किमया, ‘इतके’ केले कलेक्शन

पठाण चित्रपटाने गाठली कमाई ची किमया, ‘इतके’ केले कलेक्शन

मुंबई | Mumbai

बॉलिवूड (Bollywood) किंग शाहरुख खानचा पठाण (Pathan) हा चित्रपट सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे.  पठाणला प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. यामुळे हा चित्रपट बॉक्सऑफिसवर (box office) आपली जागा टिकवेल की नाही, याविषयी शंका उत्पन्न केली जात होती. मात्र सर्व नकारात्मक शंका बाजूला सारत, किंगखान च्या पठाण ने बॉक्सऑफिसवर आपला जलवा कायम ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

शाहरुख खान, दीपिका पदुकोणच्या (Shah Rukh Khan, Deepika Padukone) पठाण ने २२व्या दिवशीही जगभरात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आलेख अपेक्षे पेक्षाही जास्त उंचावल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

शाहरुखच्या पठाण ने आतापर्यंत जगभरात तब्बल 953 कोटींची कमाई केली आहे. उल्लेखनीय कमाई (Collection) बरोबरच हा चित्रपट आता हिंदी चित्रपटांच्या इतिहासात  जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

यापुढे जावून आगामी काही दिवस पठाण आपली क्रेझ टिकवून ठेवेल आणि त्यातून कमाईचा लक्षणीय टप्पा गाठत बॉलीवूड मध्ये आपले स्थान अढळ ठेवण्याचा प्रयत्न करेल असे जाणकारांचे म्हणणे आहे, येण्याऱ्या काही दिवसात पठाण काय किमया करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या