तृणमूल खासदार आणि अभिनेत्री 'नुसरत जहाँ' बनली आई

तृणमूल खासदार आणि अभिनेत्री 'नुसरत जहाँ' बनली आई

दिल्ली | Delhi

बंगाली अभिनेत्री (Actress) आणि तृणमूल काँग्रेसची (TMC) खासदार (Nusrat Jahan) नुसरत जहाँ हिने तिला मुलगा झाल्याची गोड बातमी दिली आहे. नुसरतला बुधवारी कोलकात्यातील (Kolkata) खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आज तिनं एका मुलाला जन्म (nusrat jahan baby) दिला आहे. डिलिव्हरी पूर्वी नुसरत हिने आपला फोटो इंस्टाग्रामवर (nusrat jahan instagram) शेअर केला होता. तर आता आई झाल्यानंतर नुसरत हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

दरम्यान नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आणि तिचा पती निखिल जैन (Nikhil jain) यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. दोन महिन्यांपूर्वी यावरून सिनेक्षेत्रासह राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. निखिल जैनने (nusrat jahan husband) नुसरतच्या पोटात असलेल्या मुलाचा बाप नसल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. तसेच सहा महिन्यांपासून आपण एकत्रही राहत नसल्याचे म्हटले होते.

नुसरत जहाँ हिने २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैन याच्याशी विवाह केला होता. नुसरत जहाँ हिने स्वत:च आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र आता नुसरत जहाँ ही हा विवाह वैध नसल्याचे सांगत आहे.

गेल्या काही काळापासून नुसरत आणि निखिल यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. आपण एकत्र राहत नसल्याचे नुसरतचा पती निखिल याने सांगितले आहे. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना निखिलने याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे तसेच ती गर्भवती असेल तर ते मुल त्याचे नसल्याचे म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com