Nude Photoshoot प्रकरणी रणवीरचा जवाब नोंदवला, दोन तास चौकशी

Nude Photoshoot प्रकरणी रणवीरचा जवाब नोंदवला, दोन तास चौकशी

मुंबई | Mumbai

न्यूड फोटो शूट प्रकरणी (Ranveer Singh Bold Photoshoot) रणवीर सिंगला (Ranveer Singh) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) काही दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आले होते. त्यांनतर आज रणवीर सिंगने पोलिसात आपला जबाब नोंदवला आहे.

रणवीर सिंग आज (२९ ऑगस्ट) चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये सकाळी ७ वाजता हजर झाला होता. यावेळी जवळपास दोन तास त्याची चौकशी आणि जबाब नोंदणी प्रक्रिया सुरु होती. यावेळी त्याची लीगल टीम देखील त्याच्या सोबत पोलीस स्टेशनला हजर होती. या दरम्याने त्याने पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर काहींनी तिला ट्रोल केले तर काहींनी रणवीरला समर्थन दिले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com