Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन‘गजनी बायडन’ म्हणत कंगनाचा ज्यो बायडेन यांना टोला

‘गजनी बायडन’ म्हणत कंगनाचा ज्यो बायडेन यांना टोला

मुंबई l Mumbai

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. जगभरातून या विजयाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतांनाच बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने ‘ज्यो बायडेन’ यांना ‘गजनी बायडन’ म्हणत टोला लगावला आहे. तर उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची कंगनाने स्तुती केली आहे.

- Advertisement -

कंगनाने ट्विट करत म्हंटले आहे कि, ” गजनी बायडेन यांच्याबद्दल मी शुअर नाही..ज्यांचा डेटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होता. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यात आले आहे, की ते 1 वर्षाहून जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, कमला हॅरिसच शो पुढे चालवतील. जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती दुसऱ्या महिलेसाठी रस्ता तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चिअर्स!”

बायडन यांना ‘गजनी’ म्हणणे आणि त्यांचा डाटा क्रॅश होतो असे म्हणत कंगनाने बायडन यांच्या स्मरणशक्तीवर प्रहार केला आहे. ‘गजनी’ या सिनेमात आमिरला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ असल्याचे दाखवले होते. कंगनाच्या मते, बायडन हे सुद्धा विसरळभोळे आहेत. कंगनाच्या या ट्विटवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे बायडन यांच्या विजयावर ती खूश नाही. अर्थात अमेरिकन उपराष्ट्रपती निवड झालेल्या कमला हॅरीस यांच्या विजयावर मात्र तिने आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या