Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ राजकारण्यांनी राजीनामा द्यावा

ज्येष्ठ राजकारण्यांनी राजीनामा द्यावा

मुंबई | Mumbai –

‘आधी राजकीय क्षेत्रातील 60 वर्षांवरील राजकारण्यांनी राजीमाने द्यावे आणि मग ज्येष्ठ कलाकारांवर बंधनं घालावीत’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले actor Vikram Gokhale यांनी सेटवर 60 वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. Not allowing artists above 65 years at shooting

- Advertisement -

कोरोना संकटात काही अटी-शर्तींसह सरकारने टीव्ही मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. पण सेटवर 60 वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाकारली आहे.

याबाबत गोखले म्हणाले, कलाकारांसाठी असा नियम असेल तर मग 60 वर्षांवरील राजकीय नेत्यांनी राजीनामे द्यावेत, त्यांनी आधी निवृत्त व्हावे, सरकारचा हा नियम ज्येष्ठ कलाकांसाठी घातक असा असून या नियमामुळं ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील, 60 वर्षांपुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी.

दरम्यान ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मागणी सरकारने फेटाळली आहे. यामुळे ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांची चांगलीच गोची झाली आहे. आता ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणाची परवानगी द्यावी अशी मागणी विक्रम गोखलेंनी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर फेरविचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नव्या नियमांसह चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचारी चेहर्‍यावर मास्क लावून सेटवर वावरत आहेत. मेकअप आर्टिस्ट तर पीपीई किट घालून कलाकारांचे मेकअप करत आहेत. राज्य सरकारनं आखून दिलेल्या मार्गदर्शक बाबींनुसार चित्रीकरणाचं काम सुरू आहे.

परंतु, मालिकेतल्या ज्येष्ठ कलाकारांना, अर्थात 65 हून अधिक वय असलेल्या कलाकारांना इतर कलाकारांसह चित्रीकरणात सहभागी होता येत नाही. त्यांना सेटवर न येण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. तरीही ज्येष्ठ कलाकारांना मालिकेत दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ कलाकारांची मालिकेतली दृश्यं त्यांच्या स्वतःच्या घरीच चित्रित करण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या