...म्हणून निलेश साबळेंनी नारायण राणेंची मागितली पाया पडून माफी

...म्हणून निलेश साबळेंनी नारायण राणेंची मागितली पाया पडून माफी

मुंबई l Mumbai

मराठीतील प्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) चे निवेदक आणि दिग्दर्शक निलेश साबळे (nilesh sabale) व त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांची पाया पडून माफी मागितली आहे.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. नारायण राणेंची बदनामी होईल असं पात्र रंगवण्यात आलं, असा आरोप राणेंच्या समर्थकांनी केला होता.

त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक निलेश साबळे आणि टीमने काल (२३ नोव्हेंबर) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील (nitesh rane) उपस्थित होते. राणे यांच्या समर्थकांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तसेच, नारायण राणे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षक आहेत. त्यांनी कलाकारांचा नेहमी सन्मान केला आहे. अशावेळी एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परत अशी चूक होणार नाही. असे निलेश साबळे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.