क्रुझवरील हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; शाहरुख खानचा मुलगा NCB च्या ताब्यात

क्रुझवरील हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; शाहरुख खानचा मुलगा NCB च्या ताब्यात

मुंबई | Mumbai

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील (cordelia cruise) हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर (drug party) NCB ने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. NCB नं यात एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

दरम्यान NCB ने केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा (shahrukh khan son) आर्यन खान (aryan khan) याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर NCB ने आर्यन खानचे (aryan khan age) नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आर्यनसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.

क्रुझवरील हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; शाहरुख खानचा मुलगा NCB च्या ताब्यात
इगतपुरी रेव्ह पार्टी : त्यांनी आखला होता तीन दिवसांच्या पार्टीच्या बेत

पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी RTPCR या कोडवर्डचा वापर

दरम्यान मुंबई-गोवा क्रूझमध्ये (Mumbai-Goa cruise) ड्रग पार्टी (Drug Party) होणार असल्याची माहिती NCB ला प्राप्त झाली होती. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या नेतृत्वातNCB चे एक पथक या क्रूझवर पोहोचले. मात्र ही क्रूझ समुद्राच्या मध्यमागी पोहोचल्यानंतर क्रूझवर ड्रग पार्टी सुरू झाली. या पार्टीत उपस्थित लोक खुलेआम ड्रगचे सेवन करत होते. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने कारवाई सुरू केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी RTPCR या कोडवर्डचा वापर करण्यात आला होता.

क्रुझवरील हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; शाहरुख खानचा मुलगा NCB च्या ताब्यात
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

Related Stories

No stories found.