Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनरिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी

रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी

मुंबई | Mumbai –

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीची रविवारी चौकशी केली. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि ड्रग्ज सेवन याबाबतही रियावर

- Advertisement -

आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या चौकशीत गौरव आर्याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे रियासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.ड्रग्जसाठी रियाने गौरव आर्याला संपर्क केल्याचा आरोप आहे.

सीबीआयने याप्रकरणी शनिवारी स्मिता पारेख, राधिका नेहलानी, संदीप सिंह यांची चौकशी केली. मात्र, दिपेश सावंतला एनसीबीने ताब्यात घेत त्याची कसुन चौकशी केली असता त्याने रिया आणि शौविकच्या सांगण्यावर सॅम्युअल मिराडाकडुन ड्रग्जची ने-आण केल्याची कबुली दिली.

यामुळे सॅम्युअल यालाही एनसीबीने अटक केली आहे. न्यायालयाने सॅम्युअल आणि सावंतला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.रविवारी सकाळी एनसीबीचे अधिकारी रियाच्या घरी चौकशीचे समन्स घेऊन पोहचली. यावेळी रियाला 2 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, रिया एनसीबी कार्यालयायात हजर झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी संशयास्पद आणि चुकीची माहिती रियाकडून देण्या आल्याचे सुत्रांनी सांगितले.

त्यामुळे एनसीबीने शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि रियाची समोरासमोर बसवून चौकशी केली.ड्रग्जप्रकरणी तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथून आरोपी ड्रग डीलर झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना एनसीबीने अटक केली. या दोघांनाही 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर ठेवण्यात आले आहे.

एनसीबीने कैझान इब्राहिम नावाच्या ड्रग डीलरला देखील अटक केली होती. पण, शनिवारी त्याला जामीन मिळाला.सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी यूट्यूब चॅनेलवरून अफवा पसरवल्याप्रकरणी ओमर सर्वांगण्या याला सायबर पोलिसांनी नोटीस पाटवली होती.

त्यानंतर याप्रकरणी 505(2), 500, 501, 504, अंतर्गत गुन्हा दाखल करून ओमरला अटक करण्यात आली. जामीनावर त्याची सुटकाही करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या