नवाजुद्दीन सिद्दीकी
नवाजुद्दीन सिद्दीकी
मनोरंजन

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'रात अकेली हैं' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

नवाज सोबत राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी, निशांत दहिया सारखे मोठे कलाकार मुख्य भूमिकेत

Nilesh Jadhav

"रात अकेली हैं" या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा एका कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यात घराचा मालक ठाकूर रघुबीर सिंग यांचा मृत्यू झाला आहे.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी, निशांत दहिया, तिग्मांशू धूलिया आणि आणखी बरेच कलाकार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रंजक आणि सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाची कथा हॉलिवूडच्या 'निव्ह्स आउट' या सिनेमाशी मिळती जुळती आहे.

knives out
knives out

हा चित्रपट 31 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com