मनोरंजन सृष्टीत सर्वाधिक उलाढालीचं वर्ष…

मनोरंजन सृष्टीत सर्वाधिक उलाढालीचं वर्ष…

हिंदी चित्रपट सृष्टीसाठी 2019 हे वर्ष विशेष होते.

नाशिक | प्रतिनिधी 

2019 हे वर्ष संपायला अवघा एक दिवस बाकी असून या वर्षात अनेक संसस्मर्णीय घटना घडल्या. यापैकी चित्रपटांकडे बघितले तर हिंदी चित्रपट सृष्टीसाठी हे वर्ष विशेष होते. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपटांनी कमबॅक केले. काहींना चांगली जग मिळाली तर काहींना जम  बसवता आली नाही. अशाच काही चित्रपटांवर नजर टाकूया….

दरम्यान, जानेवारी 19 मध्ये हिट ठरलेला चित्रपट म्हणजे उरी-द सर्जिकल स्ट्राईक. 2019 या वर्षाची जोरदार सुरवात चित्रपटाने केली. त्यानंतर आलेला व सर्वाधिक कमाई करणारा वॉर चित्रपट ठरला. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची उत्तम केमिस्ट्री जमली होती.यात अधिकाधिक ऍक्शन दृश्ये चित्रित करण्यात आली. या चित्रपटानंतर तरुणाईने उचलून धरलेला चित्रपट म्हणजे शाहिद कपूर ची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग होय. या चित्रपटाने तरुणाईला वेड लावले कारण प्रेमकथेवर आधारित असणार्‍या इतर प्रेमकथांपेक्षा अगदी वेगळा हा चित्रपट ठरला. तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ चा ‘कबीर सिंग’ रिमेक आहे. या चित्रपटाने 350 कोटींहून अधिक कमाई केली.

यानंतर 2019 च्या सर्वाधिक कमाईच्या लिस्टमध्ये ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने तिसरा नंबर मिळवला.जम्मू- काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक.’ या चित्रपटातील डायलॉग आणि विकी कौशलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटींहून अधिक गल्ला जमवला.

2019 या वर्षात अनेक विषयांना हात घालताना मिशन मंगल या चित्रपाची आठवण नक्कीच सर्वाना होईल. मिशन मंगल हा चित्रपट मंगळयान मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक राकेश धवन आणि त्यांचे सहकार्‍यांना एक मानवंदना आहे. या चित्रपटात मंगळ ग्रहावरील मोहिमेसंदर्भात हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, कृति कुल्हारी हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाने 280 कोटींहून अधिक गल्ला कमावला होता.

त्यानंतर आलेला सुपर 30 हा चित्रपट सर्वांत सुंदर कलाकृती म्हणून नावारूपास आला. गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता ह्रितीक रोशन याने मुख्य भूमिका केली. या चित्रपटातील हृतिक रोशनच्या भूमिकेस प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

तर मुंबईच्या गल्लीबोळात प्रसिद्ध असलेल्यारॅपर्सवर आधारित गल्ली बॉय या चित्रपाला तरुणांनी अक्षरश डोक्यावर घेतले. रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि सिद्धांत चतुर्वेदीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ’गली बॉय’ने देखील प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवला. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाने 144 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला.

दरम्यान 2019 च्या शेवटी मराठा साम्रज्याचा इतिहास सांगणारा पानिपत हा सिनेमा झळकला. या चित्रपटात सदाशीवराव पेशव्यांची भूमिका अर्जुन कपूरने साकारली आहे. या चित्रपटास सुरवातीला त्रास सहन करावा लागला. मात्र प्रदर्शनानंतर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com