Wednesday, April 24, 2024
HomeमनोरंजनDrug Case : आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरावर NCB चा छापा

Drug Case : आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरावर NCB चा छापा

मुंबई l Mumbai

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक मोठ्या सेलिब्रिटींची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. एनसीबीने नुकतीच मोठी कारवाई करत प्रसिद्ध निर्माता फिरोज नाडियाडवाला (Bollywood producer Firoz Nadiadwala) यांच्या घरी धाड टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्या पाठोपाठ आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुंबईतील घरी NCB ने छापा टाकला आहे.

- Advertisement -

दरम्यान NCB ने सोमवारी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या(Arjun Rampal) मुंबई स्थित घरात छापा घालत तपास केला. ही कारवाई बॉलिवूड ड्रग्स प्रकरणा(Bollywood Drugs Racket) एनसीबीच्या तपासाचा हिस्सा असल्याचे मानले जात आहे. अर्जुन रामपालचे नाव या आधीही आले होते.

NCB ने गेल्याच महिन्यात अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अगिसिलाओसला अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅब्लेट आढळल्या होत्या. एनसीबीने त्याला लोणावळा येथून अटक केली. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला. अर्जुनच्या ऑफिसमध्येही तपास केला जात आहे. असंही सांगितला जात आहे की अर्जुन रामपालच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे.

Drug Case : चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या घरावर NCB चा छापा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना मुंबईत लॉकडाऊन काळातही बंदी असलेल्या ड्रगचा पुरवठा व्यवस्थित सुरू होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी स्वतंत्र तपासकाम सुरू केले. छापे टाकून तसेच संशयितांची चौकशी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला पण अटक केली.

दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोन (Actress Deepika Padukone) हिची ट‌ॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) हिने अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला ड्रग प्रकरणात करिश्माविषयी संशय वाटत आहे. करिश्मा तिच्याकडे असलेली महत्त्वाची माहिती लपवत असल्याची शक्यता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने व्यक्त केली आहे. काही दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अचानक करिश्माने आपण क्वान या टॅलेंट एजन्सीतील नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती माध्यमांना मिळेल अशी व्यवस्था केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या