Drug Case : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCB चा छापा

छापेमारी दरम्यान सापडला गांजा
Drug Case : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCB चा छापा

मुंबई | Mumbai

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील एकामागोमाग एक कलाकार हे एनसीबी(NCB)च्या रडारवर येत आहेत. आता एनसीबीने प्रसिद्द कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष यांच्या मुंबईतील घरी छापा टाकला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

NCB च्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकला. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर NCB ने ही कारवाई केली. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात एनसीबी छापे टाकत आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नाव समोर आली आहेत. यात रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल त्याची प्रेयसी गॅब्रीएला यांचीदेखील यापूर्वी एनसीबीने चौकशी केली आहे.

याआधी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले गेले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत ३ लाख ६६ हजार ६१० रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली. तसेच, फिरोज यांची देखील चौकशी करण्यात आली.

तसेच ९ नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल ७ ते ८ तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावण्यात आले होते. अर्जुनसह त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हीची देखील चौकशी करण्यात आली होती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com