'या' तारखेला प्रदर्शित होणार नागराज मंजुळे आणि अमिताभ यांचा 'झुंड'

अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारणार
'या' तारखेला प्रदर्शित होणार नागराज मंजुळे आणि अमिताभ यांचा 'झुंड'

मुंबई l Mumbai

फँड्री', 'सैराट' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता नागराज मंजुळे 'झुंड' हा सिनेमा घेऊन येत असून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे.

महानायक अमिताभ यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट १८ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे.

नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावरुन प्रदर्शन तारीख जाहिर केली आहे. हा चित्रपट स्लम सॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचं वृत्त यापूर्वी आजतकने दिले होतं. एका वर्षापूर्वी ह्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र काही कायदेशीर अडचणींमुळे आणि कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 18 जूनला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीमनंही मंजुळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, या सिनेमाच्या शूटिंगवेळी अनेक अडचणी आल्या. सतत शूटिंगच्या तारखांमध्ये बदल होत होता यामुळे अमिताभ यांचे कामाचे शेड्युअलही बिघडत होते. त्यामुळे अमिताभ यांनी हा सिनेमा करणार नसल्याचे नागराज मंजुळेला कळवले होते. निर्मात्यांकडून घेतलेले मानधनही अमिताभ यांनी परत केले होते. अमिताभ यांना परत सिनेमात आणण्यासाठी आमिर खानला मध्यस्ती करावी लागली होती.

अमिताभ बच्चन यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार

‘झुंड’ चित्रपटाची तारीख जाहीर झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस लोकशाही पद्धतीने आधीपासूनच इंधन दरवाढीचा विरोध करत आलं आहे. जिथे अमिताभ बच्चन किंवा अक्षयकुमारच्या सिनेमाचं शूटींग सुरु असेल, तिथे काळे झेंडे दाखवणार, अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेस कार्यकर्ता काळे झेंडे दाखवेल. प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते सिनेमा थिएटरबाहेर काळे झेंडे दाखवून विरोध करणार, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com