Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनVIDEO : नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन, अजय-अतुलचे म्युझिक अन् बिग बींची स्टाईल; 'झुंड'चा...

VIDEO : नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन, अजय-अतुलचे म्युझिक अन् बिग बींची स्टाईल; ‘झुंड’चा टीझर बघाच

मुंबई | Mumbai

सैराट (Sairat), फँड्रीसारखे (Fandry) तगडे मराठी सिनेमे (Marathi movies) दिल्यानंतर मराळमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj manjule) यांनी हिंदीत उडी घेतली आणि ‘झुंड’ (Jhund) या हिंदी सिनेमाची घोषणा झाली. या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ (amitabh bachchan) बच्चन देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर (jhund teaser) प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर (Social media) चर्चेत आहे.

- Advertisement -

नागराज मंजुळे यांनी टीझर आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला आहे.या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांनी एन्ट्री आणि त्यांची ‘झुंड’ स्टाईल पहायला मिळतेय. टीझरमध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लाहान मुलांची टीम देखील दिसत आहेत. सोबतच बॅगराऊंडला चित्रपटातील गाण्याचं म्युझिकही (jhund music) ऐकायला मिळतंय.

‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हे कलाकार देखील दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाला अजय-अतुल (Ajay Atul music) या जोडीने संगीत दिले आहे.

‘झुंड’ हा अमिताभ व नागराज यांचा सिनेमा विजय बारसे (Vijay Barase) या फुटबॉल प्रशिक्षकाच्या (Football coach) जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम (Football team) बनवली होती. ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची (retired sports teacher) भूमिका साकारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या