भारती सिंग आणि हर्षच्या अडचणीत वाढ; NCB ने दाखल केले २०० पानांचे आरोपपत्र

भारती सिंग आणि हर्षच्या अडचणीत वाढ; NCB ने दाखल केले २०० पानांचे आरोपपत्र

मुंबई | Mumbai

लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा नवरा लेखक-निर्माता हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई एनसीबीने (NCB) भारती आणि हर्ष यांच्या विरोधात २०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.

त्यांना २०२० मध्ये ड्रग्सच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली. याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची विविध प्रकरणे समोर आली होती. एनसीबीने तपास सुरु केला तेव्हा अनेक मोठे सेलिब्रिटीची नवे यामध्ये समोर आली होती.

NCB ने ड्रग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक मोठ्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. याच दरम्यान NCB ने २१ नोव्हेंबर २०२० मध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले होते. यामध्ये भारती आणि हर्षच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली NCB ने या दाम्पत्याला अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com