…म्हणून आर्यन खान आज NCB समोर हजर होणार

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (cruise drugs party case) एनसीबीने (Narcotics Control Bureau) आर्यन खानला (Aryan Khan) २ ऑक्टोंबरला अटक केली होती. त्यानंतर तब्बल २७ दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयातून (Mumbai High Court) जामीन मिळाला. यावेळी न्यायालयाने काही अटींवर आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान सुटका झाल्यानंतर पहिल्यांदा आर्यन खानला आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी NCB च्या कार्यालयामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खानला जामीन मंजूर करताना न्यायालयानं आर्यन खानला काही अटी घालण्यात आल्या होता.

त्यानुसार, NCB कार्यालयात प्रत्येक शुक्रवारी ११ ते २ या वेळात हजर रहावे लागणार आहे. आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आपल्या मुख्य आदेशात अटींबाबत अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत.

दरम्यान मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *