'मेरे देश की धरती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'कार्निवल मोशन पिक्चर्स'ची निर्मिती
'मेरे देश की धरती' लवकरच प्रेक्षकांच्या  भेटीला
मेरे देश की धरती

मुंबई | Mumbai

कार्निवल ग्रुपची निर्मिती असलेला 'मेरे देश की धरती' हा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कार्निवल मोशन पिक्चर्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी 'मेरे देश की धरती'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. दिव्यांदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'मेरे देश की धरती' या चित्रपटाचं दिग्दर्शन फराज हैदर यांनी केलं आहे. याशिवाय ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर यांच्यासह इतर प्रतिभावान कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे.

'मेरे देश की धरती' या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणाऱ्या जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

जनमानसापर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा हा चित्रपट एक ‘पेट्रियोटिक ड्रामा’ आहे. पोस्ट प्रोडक्शनसह चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींचे काम पूर्ण झाले असून, लवकरच चित्रपट रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. भोपाळमधील सेहोर जिल्ह्यासह मुंबई आणि आसपासच्या भागात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

'मेरे देश की धरती' हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असल्याचे सांगत कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर म्हणाल्या की, ‘एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसह संपूर्ण जग सध्या एक अनोखे युद्ध लढत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यास आम्हीही उत्सुक असून, आमची संपूर्ण टीम त्या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com