'झुकेगा नही साला'....पुष्पा चित्रपटानंतर भन्नाट मिम्स व रील्सचा सोशल धुमाकूळ

'झुकेगा नही साला'....पुष्पा चित्रपटानंतर भन्नाट मिम्स व रील्सचा सोशल धुमाकूळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पुष्पा (Pushpa Movie) या सिनेमाचीच चर्चा आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा (alluarjunonline) पुष्पा या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे...

pc : social media
pc : social media

बॉक्स ऑफिसवर (box office) देखील या चित्रपटाने धुमाकूळ घालत तीनशे कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनचे नशीब या सिनेमाने फळले असून नुकतीच त्याला एका संस्थेकडून १०० कोटी रुपयांची ऑफर (100 cr offer after pushpa movie to allu arjun) देण्यात आल्याचे समजते.

pc : wirally.com
pc : wirally.com

सोशल मीडियावर तर या चित्रपटातील गाण्यांची रील्स आणि डायलॉग्स प्रचंड व्हायरल झाले आहेत. नुकताच या गाण्याचे मराठी टीझर आले, मराठी श्रीवल्ली गाण्यावर नवरा बायको थिरकले. प्रचंड प्रसिद्धी या जोडप्याने मिळवली.

pc : wirally.com
pc : wirally.com

अनेकांच्या स्टेट्सला श्रीवल्लीशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. हिंदी डब चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून होती. हा चित्रपट आला परंतु या चर्चा राहिली ती आपल्या मराठी श्रेयस तळपदेची.

कारण हिंदी अल्लू अर्जुनचा आवाज श्रेयसने दिला आहे. अधूनमधून चित्रपटातील मराठी डायलॉग, मराठी शब्द या चित्रपटाला आपलेसे करतात. यामुळे महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे.

या चित्रपटामुळे अनेकांनी मराठी मिम्स बनवले. संपर्काचे प्रभावी माध्यम असलेला सोशल मीडिया या मिम्सने हाउसफुल झाला आहे. श्रीवल्ली गाण्यातील तो अनोखा डान्स अनेकांना भावतो.

टीव्हीसमोर उभे राहून अनेक लहान मुलांच्याही काळजाचा ठोका या श्रीवल्लीने चुकवला आहे. लहान मुलांचे असे अनेक डान्स व्हायरल झाले.

दुसरीकडे, स्थानिक कलाकारांनी तर पुष्पा या सिनेमातील गाण्यावर अनेक चाली लावून बघितल्या. तसेच कराओकेवर तर अनेकांनी गाणेही गायले आहेत. युटूबर्सने तर रक्तचंदन काय भानगड आहे हेदेखील शोधून काढत त्यावर प्रसिद्धी मिळवली.

नुकतेच विंडीजचा क्रिकेटपटून ब्राव्होने या श्रीवल्ली गाण्यावर थिरकत अल्लू अर्जुन स्टाईल मारली आहे. झुकेगा नही साला या डायलॉगवर अनेक मिम्स व्हायरल झाले.

पुष्पा सारखा लुक ठेवून फनी व्हर्जन म्हणत अनेकांनी मिलियनमध्ये युट्युबला व्ह्यूज मिळवले आहेत. पुष्पाचे काही साईड इफेक्ट्स व्हायरल झाले यात तेरी झलक अश्रफी म्हणून अनेक व्हिडीओंनी धुमाकूळ घातलेला आहे. शिखर धवननेदेखील या गाण्यावर डान्स केल्याचे दिसून येत आहे.

निवडक मिम्स असे

डेल्टा हो या ओमीक्रोन

मे मास्क उतरेगा नही

मी काय गुलाबाचे फुल हाय!

मी बॉम्ब हाय बॉम्ब

फुटल्यावर भल्ला मोठा आवाज होतो आवाज

श्रीवल्ली गाण्यानंतर देशातील अर्ध्या तरुणांना पोलिओ झाल्यासारखं वाटतंय

'तेरी झलक वेगळी'

माय माईन्ड : नवीन वर्षात जिमला जाईन

मी : उठेगा नही साला

पुष्पा - पुष्पराज

पुष्प्या तू जरा गप बसतोस का?

पुष्पा - पुष्पराज

जवळकर - उद्योगभूषण यदुनाथ जवळकर

आता पुढच्या खेपेला एकटा येत नसतो

जोडीनं येणार जोडीनं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com