'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी जाधव हिचं अपघाती निधन

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी जाधव हिचं अपघाती निधन

कोल्हापूर | Kolhapur

मराठी टिव्हि क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक आणि दुख:द बातमी समोर आली आहे. 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा हिचा अपघातात मृत्यू झालेला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथं एका डंपरच्या धडकेत तिचा मृत्यू झालेला आहे.

काही दिवसांपूर्वी हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने तिने (Marathi Actress) हाॅटेल सुरू केले होते. हाॅटेल बंद करुन बाहेर पडताना एका भरधाव डंपरने कल्याणीला धडक दिली ज्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कल्याणीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता. कल्याणीने काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील हालोंडी फाटा येथे ‘प्रेमाची भाकरी’ नावाने हॉटेल सुरू केले होतं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com