Dharmaveer 2 : ठरलं! ‘धर्मवीर 2’ येणार, निर्मात्यांकडून अखेर घोषणा... कधी होणार प्रदर्शित?

आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार?
Dharmaveer 2 : ठरलं! ‘धर्मवीर 2’ येणार, निर्मात्यांकडून अखेर घोषणा... कधी होणार प्रदर्शित?

मुंबई । Mumbai

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच 'धर्मवीर 2' ची घोषणा करण्यात आली आहे.

'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' ह्या बहुचर्चित चित्रपटाचा नुकताच वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. "धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत" अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली. धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे.

धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांची अखंड राजकीय कारकीर्द पाहायला मिळाली होती. या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघे यांचे निधन झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

१३ मे रोजी हा चित्रपट तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृह आणि १० हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या चित्रपटाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com