रितेश-जिनिलीयाच्या बहुचर्चित ‘वेड’ चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा VIDEO

रितेश-जिनिलीयाच्या बहुचर्चित ‘वेड’ चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा VIDEO

मुंबई | Mumbai

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेलरमध्ये रितेश आणि जिनिलीया पती-पत्नीच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते अशोक सराफ यांनी रितेशच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पतीवर एकतर्फी प्रेम असलेल्या पत्नीच्या भूमिकेत जिनिलीया दिसतेय. प्रेम, इमोशन्सचा तडका या ट्रेलरमध्ये आहे.

वेड हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'वेड' हा जेनेलियाचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे तर रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com