Jatra 2 : 'अलबत्त्या गलबत्त्या, कोण फोडतो खलबत्त्या' म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येतोय ‘जत्रा 2’, पाहा पोस्टर

Jatra 2 : 'अलबत्त्या गलबत्त्या, कोण फोडतो खलबत्त्या' म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येतोय ‘जत्रा 2’, पाहा पोस्टर

मुंबई | Mumbai

'अलबत्त्या गलबत्त्या, कोण फोडतो खलबत्त्या' हि घोषणा आठवतेय? निम्म्या रात्री कानोळेंच्या घरावर 'दार उघड कानोळे, दार उघड' असा मोठमोठ्या आवाजातला मोर्चा आठवतोय?. हि वाक्य ऐकून तुम्हाला नक्कीच 'जत्रा' या चित्रपटाची आठवण झाली असेल. जत्रा या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

आता या चित्रपटाची धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. लवकरच 'जत्रा २' (Jatra 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे यांनी त्यांच्या या चित्रपटाची घोषणा केली. तसेच कुशल बद्रिकेने आणि भारत जाधव यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Jatra 2 : 'अलबत्त्या गलबत्त्या, कोण फोडतो खलबत्त्या' म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येतोय ‘जत्रा 2’, पाहा पोस्टर
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

'जत्रा' हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर यांच्यासोबतच कुशल बद्रिके, संजय खापरे यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी 'कोंबडी पळाली' आणि 'ये गं ये ये मैना' तुफान गाजली होती.

Jatra 2 : 'अलबत्त्या गलबत्त्या, कोण फोडतो खलबत्त्या' म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येतोय ‘जत्रा 2’, पाहा पोस्टर
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

Related Stories

No stories found.