मराठी विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं करोनामुळे निधन

मराठी विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं करोनामुळे निधन

मुंबई | Mumbai

मराठी विनोदी अभिनेता आणि बिग बॉस १ फेम भूषण कडू यांची पत्नी कादंबरी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना करोनाची लागण झाली होती.

करोनाचं निदान झाल्यानंतर कादंबरी यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती खालावल्यामुळं त्यांना केईएममध्ये हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. भूषण कडू यांना सात वर्षांचा मुलगा आहे. कादंबरीच्या निधनामुळं कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.

अभिनेता भूषण कडूने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. भूषण कडू हे 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वातही सहभागी झाले होते. त्यातील फॅमिली स्पेशल भागाच्या निमित्तानं भूषण यांच्यासोबत पत्नी कादंबरी व मुलगा प्रकीर्त हे देखील बिग बॉसच्या घरात दिसले होते. ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ यासोबतच ‘कॉमेडीती बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा शोसोबतच भुषणने अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मस्त चाललंय आमचं, श्यामची मम्मी, भुताची शाळा, टारगेट अशा विविध कलकृतींमधून भूषणने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.

Related Stories

No stories found.