“आधी धमकावले, नंतर गाडी अंधारात उभी केली आणि…”; मराठी अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक प्रसंग

“आधी धमकावले, नंतर गाडी अंधारात उभी केली आणि…”; मराठी अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक प्रसंग

मुंबई | Mumbai

मराठी अभिनेत्री मनवा नाईक आपल्या गुणी अभिनयासाठी ओळखली जाते. जाऊंद्याना बाळासाहेब असो किंवा पोरबाजार या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

नुकतंच मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगावर भाष्य केलं आहे. पोस्ट शेअर करत तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटोदेखील शेअर केला आहे.

काय आहे मनवाची पोस्ट?

हा प्रसंग शेअर करायलाच हवा. मी रात्री ८.१५ च्या सुमारास उबर केली. मी वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचल्यावर तो उबर चालक हा फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलू नका असे सांगितले. त्यानंतर त्याने बीकेसीमधील एक सिग्नल तोडला. मी त्याला असे करु नका, असं पुन्हा एकदा सांगितलं. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही.

यानंतर पुढे गेल्यावर ट्राफिक पोलिसांनी त्याला अडवले. त्याचा फोटो क्लिक केला. पण त्या उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असे मी पोलिसांना सांगितले.

पण त्यानंतर त्या उबर चालकाला भयंकर राग आला. त्याने तू ५०० रुपये भरणार आहेस का? असं मला चढलेल्या आवाजात विचारले. त्यावेळी मी म्हणाली, तू फोनवर बोलत होतास. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने मला धमक्या दिल्या. थांब तुला दाखवतो, अशा शब्दात त्याने मला धमकावले.

यानंतर मी त्याला गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्या असे सांगितले. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घ्या, असे त्याला सांगत होते. तो संपूर्ण प्रवासात माझ्याशी वाद घालत होता आणि गाडीही भरधाव वेगाने चालवत होता. वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.

काय करणार… थांब दाखवतोच आता, अशी धमकीही त्याने मला दिली. त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाऱ्याबरोबर फोनवर बोलत असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मी त्या चालकाला गाडी थांबव, असे सांगितले. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. त्यावेळी त्याने कोणाला तरी फोन केला.

मी जोरजोरात हाका मारु लागली. ओरडायला लागली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढले. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे माझी घाबरगुंडी उडाली आहे.

Must share incident. I took an uber at 8.15pm. At BKC, the uber driver started talking on phone. I asked him not...

Posted by Manava Naik on Saturday, 15 October 2022

मनवाने फक्त लढ म्हण, दम असेल तर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, पोरबाजार, ढिनच्यॅक एंटरप्राइज, स्पेशल डिश, शासन, पिंडदान, जाऊ द्या ना बाळासाहेब या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘जोधा अकबर’ या सिनेमातही ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com