ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबत गाजवले होते चित्रपट
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

मुंबई | Mumbai

संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा (Maharashtra Din) उत्सव सुरू असतानाच मराठी चित्रपट जगताला मात्र धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचे हृयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

प्रेमा किरण ६१ वर्षांच्या होत्या. मुंबई (Mumbai) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे चाहते आणि निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. मराठीतील अनेक चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ यांसारख्या कलाकारांसोबत काम करून त्यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. (Marathi actress prema kiran passed away in mumbai)

अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. तसेच त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

प्रेमा किरण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. दरम्यान नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.