Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनआई, तुला आम्हाला मारून टाकावसं नाही का वाटलं?; मराठी अभिनेत्रीची मन सुन्न...

आई, तुला आम्हाला मारून टाकावसं नाही का वाटलं?; मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट

अहमदनगर l Ahmednagar

प्रेमविवाह केल्याने एका युवतीचा आई व भावाने कोयत्याने मुंडक तोडून खून केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे घडली.

- Advertisement -

सैराट चित्रपटाच्या कथानकाशी जुळणारी ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला आहे. या धक्कादायक घटनेनंतर समाज माध्यमांवर रोष व्यक्त केला जातोय. या घटनेवर मराठी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने आपल्या फेसबुक मन सुन्न करणारी पोस्ट लिहली आहे.

सैराटपेक्षाही भयंकर! प्रेमविवाह करणाऱ्या युवतीचं मुंडकं धडावेगळं केलं

मीनाक्षी या पोस्टमध्ये म्हणते की,

“आई… 1)मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताई चा. 2) माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा! पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली! 3) काल परवा आपल्या लहान मुलीचं ही intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचंं बीज तुला कुठे गवसलं? आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं? हे असच “कीर्ती थोरे “च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्ती ला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडू दे आई! काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा swag खर्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!

- Advertisment -

ताज्या बातम्या