केतकी चितळेच्या अडचणी काही संपेना; 'त्या' प्रकरणात ५ दिवसांची पोलीस कोठडी

केतकी चितळेच्या अडचणी काही संपेना; 'त्या' प्रकरणात ५ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई । Mumbai

केतकी चितळेच्या (Ketaki Chital) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट (Facebook Post) लिहिल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळेला आता आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

अॅट्रॉसिटी प्रकरणात (Atrocity Case) ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. २५ मे रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील निर्णय देण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com