मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या

आत्महत्येने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ
मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या

मुंबई | Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. नांदेडमधील राहत्या घरी आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. आशुतोषने घरी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने मराठी चित्रपटसृष्टीवरही शोककळा पसरली आहे.

आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखशी 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकला होता. आशुतोषने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करतोय. त्याच्या आत्महत्येने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com