Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनसुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये सोशल मीडियावर जुंपली

सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये सोशल मीडियावर जुंपली

मुंबई | Mumbai

मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते आणि अभिनेत्री या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. अनेक वेळा सेलिब्रिटी हे वेगवेगळे विषय सोशल मीडियावर मांडतात.

- Advertisement -

काही वेळा या पोस्टमधून ते एखाद्या व्यक्तीवर टिका करतात, तर काही वेळा ते स्वत:ची मतं मांडण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. सध्या अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि सुमीत राघवन (Sumeet Raghavan) यांच्यामध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु आहे.

काही वेळापूर्वी अमेय वाघने सुमित राघवनच्या नावाचा उल्लेख करत फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ‘जंगलात राघू (सुमित राघवन) खूप असतात, पण वाघ मात्र एकच असतो, कृपया नोंद घ्यावी,’ अशी पोस्ट अमेयने शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुमित राघवनला टॅगही केलं.

यावर सुमित राघवननेही एक पोस्ट लिहीत त्याला उत्तर दिलं आहे. ‘सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ हॉट नाही याचीही कृपया नोंद घ्यावी,’ अशी पोस्ट लिहीत सुमितने अमेयला टॅग केलं आहे.

अमेय आणि सुमितने ही पोस्ट रागात येऊन केली की यामागे दुसरं कोणतं कारण आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तसंच नेटकऱ्यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं अजून अमेयने दिलेलं नाही. तर अमेय आगामी चित्रपटाचं प्रमोशन करतोय, असाही अंदाज काहीजणांनी लावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या