Manobala passed away : प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शका मनोबाला यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन

Manobala passed away : प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शका मनोबाला यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन

चेन्नई | Chennai

तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला (Manobala) यांचे चेन्नई (Chennai) येथे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील साळीग्रामम येथील एल.व्ही.प्रसाद रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दिवंगत मनोबाला यांच्या पश्चात पत्नी उषा आणि मुलगा हरीश असे कुटुंब आहे.

मनोबाला यांच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील साळीग्रामम येथील एल.व्ही.प्रसाद रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

अभिनेता-दिग्दर्शक जीएम कुमार यांनी सर्वप्रथम मनोबल यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून दिली. ही दुःखद बातमी शेअर करत त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

मनोबाला (६९) यांनी रजनीकांत, विजयकांत आणि सत्यराज यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्याबरोबर चित्रपट बनवून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी उशिराने अभिनयात प्रवेश केला होता.

ते नेहमी स्वतःला कॉमिक भूमिकांपुरते मर्यादित ठेवले होते आणि विजय आणि धनुष यांसारख्या शीर्ष कलाकारांसह अनेक सिनेमात काम केले आहेत. त्यांनी एक-दोन सिनेमांची निर्मितीही केली आहे.

१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अगया गंगई या सिनेमाचं मनोबल यांनी दिग्दर्शन केलं. त्यांनी २५ हून अधिक सिनेमांचं दिग्दर्शन केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांत 'पिल्लई निला', 'ऊर्कावलन', 'एन पुरूषांथान एनक्कु मट्टुमथान', 'करुप्पु वेल्लई', 'मल्लू वेट्टी माइनर' आणि 'पारमबरियाम' यांचा समावेश आहे.

मनोबल यांनी टीव्ही मालिकांत देखील काम केलं होतं. तसंच काही कार्यक्रमांचंही दिग्दर्शन केलं होतं. विषयाचे वेगळेपण, त्याची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, प्रभावी संगीत, दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार यामुळे मनोबल यांचे सिनेमे प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com