मल्याळम दिग्दर्शक अली अकबर इस्लाम सोडणार आणि हिंदू धर्म स्वीकारणार, वाचा काय आहे कारण

मल्याळम दिग्दर्शक अली अकबर इस्लाम सोडणार आणि हिंदू धर्म स्वीकारणार, वाचा काय आहे कारण

दिल्ली l Delhi

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जवानांच्या हौतात्म्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. एकीकडे देशभरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचा श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करत आहे,...

मात्र काही इस्लामिक कट्टरवाद्यांनी (Islamic fundamentalists) सोशल मीडियावर त्यांच्या फोटोखाली किंवा व्हिडिओखाली स्मायली टाकली होती, ज्यामुळे चित्रपट निर्माते अली अकबर (Filmmaker Ali Akbar) दुखावले आणि त्यांनी यापुढे मुस्लिम राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी जाहीर केले की ते आणि त्यांची पत्नी लुसिम्मा इस्लाम सोडून हिंदू धर्म (Hinduism) स्वीकारत आहेत.

दिग्दर्शक अली अकबर यांनी यापूर्वी सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडिओवर आक्षेपार्ह कमेंटमुळे अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर अली अकबर यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले. अकबर म्हणाले, ''ज्यांनी इमोजी टाकल्या त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर पाच मिनिटांतच खाते ब्लॉक करण्यात आले.''

अकबर पुढे म्हणाले की, मोठ्या इस्लामिक नेत्यांनीही शूर लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या ‘देशद्रोही’ अशा कृतींना विरोध केला नाही आणि हे आपण स्वीकारू शकत नाही. आपला धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी फेसबुकवर यासंबंधित व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध हजारो हसतमुख इमोजी पोस्ट करणाऱ्या लोकांना हेच माझे उत्तर आहे,' असे अकबर यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अली अकबर यांनी या फेसबुक लाइफमध्ये बिपिन रावत यांच्यासाठी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या मुस्लिम युजर्सलाही फटकारले. त्याच वेळी, आता काही लोकांनी अली अकबरची जोरदार प्रशंसा केली. दुसऱ्या एका पोस्टमध्ये अकबर यांनी, देशाने सीडीएस यांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांची ओळख करून त्यांना शिक्षा केली पाहिजे, असे म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com