Sourav Ganguly Biopic : 'दादा'गिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीच्या भूमिकेत कोण?

Sourav Ganguly Biopic : 'दादा'गिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीच्या भूमिकेत कोण?

मुंबई | Mumbai

सध्या अनेक दिग्गज व्यक्तींवर बायोपिक (Biopic) येत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महान लोकांवर या बायोपिक तयार होतात. आजपर्यंत मनोरंजन (Entertainment Biopic), खेळ (Sports Biopic), राजकारण (biopic of politicians) आदी अनेक क्षेत्रातील लोकांवर आतापर्यंत बायोपिक तयार झाल्या आहेत. यात आता अजून एका बायोपिकची भर पडणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष असणाऱ्या सौरभ गांगुली (Sourav Ganguly Biopic) यांच्यावर बायोपिक येत आहे.

स्वत: सौरव गांगुलीने याबाबत ट्वीट (Sourav Ganguly Tweet) करत माहिती दिली आहे. सौरव गांगुलीने ट्वीट करत लिहिले आहे की, 'क्रिकेटच माझे जीवन आहे. क्रिकेटने मला आत्मविश्वास दिला आहे. ज्यामुळे मी आज ताठ मानेने जगू शकलो. माझा हा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, लव फिल्मस माझा हा प्रवास मोठ्या पडद्यावर आणणार आहे'.

सौरव गांगुली निर्विवादपणे भारताच्या सर्वात यशस्वी आणि वादग्रस्त क्रिकेट कर्णधारांपैकी एक आहेत आणि त्यांचे पात्र चित्रपटासाठी नेहमीच एक मनोरंजक विषय होते. सौरव गांगुलीने क्रिकेट विश्वात ९० च्या दशकापासून ते आजपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा योगदान दिले आहे, सध्याच्या भारतीय क्रिकेटला सजवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची प्रमुख भूमिका आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असताना त्याच्या कारकीर्दीत गांगुलीने अनेक प्रतिभावान खेळाडूंना पाठिंबा दिला जे नंतर भारतासाठी अनेक प्रसंगी मॅच विनर ठरले.

दरम्यान मोठ्या पडद्यावर सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार, यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गांगुलीची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com