गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण; ICU मध्ये दाखल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण; ICU मध्ये दाखल

मुंबई | Mumbai

जेष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना करोनाची (covid19) लागण झाली आहे. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील बीच कॅंडी रुग्णालयात (Breach Candy hospital Mumbai) उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचं वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आलं आहे. त्यांची भाची रचना म्हणाली की त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

यापूर्वी, त्यांना नोव्हेंबर 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लता मंगेशकर आज तब्बल 92 वर्षांच्या आहेत. लता मंगेशकर देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com