सुब्रमण्यम स्वामींनी केली अक्षय कुमारच्या अटकेची मागणी; काय आहे कारण?

सुब्रमण्यम स्वामींनी केली अक्षय कुमारच्या अटकेची मागणी; काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी अभिनेता अक्षय कुमारवर (Actor Akshay Kumar) गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट 'राम सेतू'(Ram setu) चा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसेच अक्षय कुमार विरोधात आपण कोर्टात केस दाखल करणार आहोत असं स्वतः सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे की,'अक्षयच्या राम सेतू सिनेमात काही घटना ,मुद्दे हे चुकीचे दाखवले गेले आहेत. मूळ घटनेसोबत,काही मुद्द्यांसोबत छेडछाड करुन विषयाला भरकटवले आहे. ही केस माझ्यातर्फे वकील सत्या सभ्रवाल लढवणार आहेत. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडियावर त्यांच्या राम सेतू सिनेमात चुकीचे मुद्दे दाखवले गेल्यामुळे मोठं नुकसान झाल्याची केस दाखल करत आहे.'

तसेच सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्वीट करत लिहिलं आहे-जर अक्षय कुमार एक परदेशी नागरिक आहे तर त्याला आपण अटक करण्याची मागणी नक्कीच करू शकतो. ज्या देशाचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे त्या देशाला आपण त्याला अटक करण्याची, त्याचं नागरिक्त्व रद्द करण्याची मागणी देखील करू शकतो.

दरम्यान या सिनेमामध्ये जॅकलीन फर्नांडिस,नुसरत भरुचा, सत्यदेव हे कलाकार आहेत. हे देखील या सिनेमाच्या पोस्टरमध्ये दिसत आहेत. राम सेतू सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर तो अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com