लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Bharatratna Lata Mangeshkar) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यासाठी देशभरातील चाहत्यांनी देवाकडे धावा सुरु केला आहे. त्यांच्या आरोग्यासोबतच्या काही अफवाही दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांच्या परवानगीनंतर लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांची टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. लतादीदींच्या तब्येतीत सध्या सुधारणा होत आहेत. पण अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लता दीदींनी करोनासोबतच न्यूमोनियाही झाला होता. त्यांचं वय पाहता, प्रकृती सुधारण्यास वेळ लागेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं, तसंच त्या लवकर बऱ्या व्हाव्या, यासाठी प्रार्थना करा, असं आवाहनही डॉक्टरांनी केलं होतं. लता दीदींच्या जगभरातील चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळं लता दीदींची प्रकृती सुधारते आहे.

याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com